झाला शेवट हा गोड ।

झाला शेवट हा गोड । देवे पुरविले कोड ॥
नाही पडली आटाआटी । हरि उभा राहे पाठी ॥
नसता आमुचिये मनी । हाती घेववी लेखणी ॥
तुकड्या म्हणे गोड केली । सेवा देवे स्वीकारिली ॥