दान हेचि मागो सख्या पंढरीराया!।

दान हेचि मागो सख्या पंढरीराया!।
नामाविण वाया न गमो क्षण ॥
काया वाचा मने घडो जनसेवा ।
लागो जीवभावा भक्ति तुझी ॥
जागृती वा स्वप्नी न सुटोचि हा ध्यास ।
तयाविण आस नुरो मज.  ॥
तुकड्यादास म्हणे गोड हा शेवट।
वृत्ति राहो नीट स्वरुपी मग्न॥