करी लोकी उपकार

करी लोकी उपकार । परी न बोले बाहेर ।
लाभ हानि गुहय ठेवी । सुखदुःखासी पचवी ॥
निंदास्तुति न घे कानी । राहे पुढे सेवा-स्थानी ॥
तुकड्या म्हणे गृहस्थाश्रम । तोचि करी जनी नाम ॥