कोण म्हणे धन करू नये गाठी

कोण म्हणे धन करू नये गाठी । हींडावे कपाटी हाटी सारे।
मांगोनिया भीक कोण पुरवील ? । संसार होईल कैसा याने ? ॥
शेत बागाईत कशाने करावे । धनावीण व्हावे फकीरचि ॥
तुकड्यादास म्हणे धन-जोड़ करा । सत्याच्या व्यापारा करोनिया ।॥