चोरुनी आणिले कैसे ते पचेल

चोरुनी आणिले ते कैसे पचेल । धन ते जाईल त्याच मार्गी ।॥।
कष्ट करोनिया जे धना जोडिती। तेचि सुखी होती सर्वकाळ ।॥
उत्तप व्यवहार दयां दिनांवरी । धन्य तो संसारी जन्मा आला ॥
तुकड्यादास म्हणे तयाच्या मरणी । रडतींल जनी लोक सारे ॥