सूकरा समान भोगावे विषय

सूकरासमान विषय भोगावे । 
क्षयाने मरावे अंतकाळी।
ऐसी आज्ञा दिली कोणत्या गाढवे ?। 
कैसे त्या म्हणावे थोर आम्ही?
देहा करा नाश गोड़ हा संसार । 
ऐसा कोणी तार दिला काय ? ।।
तुकड्यादास म्हणे करावे संतान । 
व्हाया निसंतान कोण म्हणे ? ॥