कांतिचिया सुखा हा होय बंदर

कांतिचिया सुखा हा होय बंदर । फिरे वारंवार भोवताली ॥
कर्म धर्म सारे सोडले गंगेसी । मानी बाईलेसी देवासम  ।
धैर्य गमाविले धना खाक केले । स्त्रीयेसाठी झाले चिंताचूर ।।
तुकड्यादास म्हणे जळो हा संसार । आम्हा नाही प्यार ऐसियाचा ॥