वस्तूहूनि बाद वस्तूचे अंतर

 वस्तुहूनि बाद वस्तुचे अंतर । तैसा सारंगधर वस्तु नाही ॥
प्रकाशे तयाच्या प्रकाशली माया । तिने केली काया गुणत्वाची ॥
गुणे झाले जग वाढले मोडले । तैसे नाही झाले ब्रह्मी कार्य ॥
तुकड्यादास म्हणे एकरस सदा । ऐशा त्या गोविंदा घ्याहो कोणी ॥