शाळा कधी कोण करी

शाळा कधी कोण करी ?। फिरे नदीचिया तिरी ॥
धाक मास्तराचा ठेवी । सांगे बापाची नागवी ॥
चोरूनिया द्रव्य आणी ।खाई बाजारी घेऊनी ॥
तुकड्या म्हणे ऐसे पोर । पोर नव्हे समजा ढोर ॥