सदा खावयाची हाक

सदा खावयाची हाक । परी लोकांमाजी धाक ।।
चालतांना पड़े आड्या । परी गुर्रावे  माकड्या ।
तोंडी चपटले नाक । परी मिरवीतो शौक ॥
तुकडया म्हणे ऐसे पोर । पोर नव्हे समजा ढोर ।।