शरीराच्या सिंहासनी ।

शरीराच्या सिंहासनी । गुरु बैसे हृदयस्थानी ॥१॥
करू सतरावीने स्नान । पुष्प वाहू मन-प्राण ॥२॥
शांतिमाळ घालू गळा । ज्ञानदीपाचा सोहळा ।॥३॥
तुकड्या म्हणे पूजा करू । नाम निशाण विसरू ।।४ ॥