गावी कोणी बरे पाही

गांवी कोणी बरे पाही । ऐसा न दिसे एकही ।
काय कीर्ति केली पोरे । पहा पापांचे डोंगोरे ॥
कोणी घरी ना बसवी । पाहतांना वाटे छीवी ।।
तुकड्या म्हणे ऐसे पोर । पोर नव्हे समजा खोर ।।