तोचि आवडला माझिये चिंतनी
तोचि आवडला माझिये चिंतनी । त्यासी ध्यानी मनीं गावू आम्ही ॥१॥
रूप पाहू त्याचे नाम गावू त्याचे । कर्म करू साचे तयासाठी I॥२|॥
आवडीचा साठा सापडला हाता । सोडाया मागुता नेघे जीव ॥३॥
तुकड्यादास म्हणे जो का सद्गुरूराव I अर्पूदेहभाव पायी त्याच्या ॥४॥