लावा मज वाटे, मन पांडुरंगाच्या पायी।

जाऊ कोणापाशी कोण सांगेल मार्ग? ।
कुसंगे नाडलो, धरू कोणाचा संग? ॥
अरत्र परत्र नाही एकही रंग ।
कोणी भीक द्यारे करा मन निःसंग ॥ १ ।।
लावा मज वाटे, मन पांडुरंगाच्या पायी।
तयावीण शांती मनी आणीके नाही ।। धृ० ।।
संसार ओंगळ विषयी-जंत त्यामाजी ।
टोचती या जीवा कांची पावे जीवाजी ।।
षडविकार - वैरी साथ देताती पाजी।
चुकलो धर्म-कर्म झालो देहाचा गर्जी ॥ २ ॥लावा01॥
साधुसंत कोणी भीक वाढा या दीना ।
सांगा निज - मार्ग अनुभवाच्या खुणा ॥
कोण मी? कोठचा आलो जगी पाहुणा।
घाला नेत्रांजन, घ्या हो आपुल्या मना ॥ ३ ॥लावा०॥
भेद-भाव उर्मी सर्व द्या हो मिटवोनी ।
मनाच्या संकल्पा मनी द्या हो मुरवोनी ॥
स्वानंदाचे लेणे आम्हा लेववा कोणी।
शरण सद्गुरुराया! जीवभावापासोनी ॥ ४ ॥ लावा०॥    प्रारब्धाचा भोग सुखे भोगेन जगी I.                           सुखदुःख भोगत्यागा  पाहे नि:संगी ॥                         ठेविले अनंते तैसा राहीन रंगी I.                                   तुकड्यादास म्हणे कृपा करा सर्वांगी ॥५ ॥ लावा o ॥