झाला प्रातःकाळ स्मराया गोविंद ।
झाला प्रातःकाळ स्मराया गोविंद । पक्षियांचा नाद ऐकू येतो ॥
सर्व गाती ते ते आपुलाल्या छंदे । नाचती आनंदे अरुणोदयी ॥
वृक्षांचे पल्लव प्रफुल्लले चित्ती । सावधान क्षिती झाली सर्व ॥
तुकड्यादास म्हणे तुम्ही का झोपता ? I. अज्ञानासि माथा धरोनिया ॥