किती झोपी गेले झोपताचि मेले ।
किती झोपी गेले झोपताचि मेले । भोगाने भोगिले काळपंथे ॥
तुम्ही तरी उठा भजा देवराव । उजाडल्या भाव सुखी रहा ॥
भक्तिचा तो दीप लावोनी अंतरी । स्मरावा श्रीहरी मनोभावे ॥
तुकड्यादास म्हणे नका करू वेळ । टपोनिया काळ वाट पाहे ॥