जागरे अज्ञाना! काय झोपलासी ।
जागरे अज्ञाना! काय झोपलासी । तुज आली कैसी झोप येथे ॥
काळाचिये घरी कामाचे बिस्तरी । झोप कैसी पुरी होय तुझी ? ॥
जे कोणी झोपले काळे ग्रासियले । आले तैसे गेले गर्भवासी ॥
तुकड्यादास म्हणे ऊठरे झोपिया! सख्या पंढरिराया प्राप्त करी ॥