झोप ही काळाची बहीण सावत्र ।
झोप ही काळाची बहीण सावत्र । अरत्र परत्र नाश करी ॥
आळसे नागवी काम पाश मोह । विषयांचा स्नेह लोळ घाली ॥
करू न दे भक्ति,पूजा योगाभ्यास । सदा लावी ध्यास कुकर्माचा ॥
तुकड्यादास म्हणे जे झोप सोडती । तेचि खरे जाती ब्रह्मानंदी ॥