उठा अरुणोदयी पवित्र व्हा देही ।
उठा अरुणोदयी पवित्र व्हा देही । आत्माराम ग्वाही ठेवोनिया ॥
अज्ञान-चिपडे धुवोनिया टाका । भक्तिचिया देखा शुद्ध जले ॥
करा स्नान ज्ञान-गंगेच्या पाझरी । अनुभव-मंदिरी पूजा करा ॥
तुकड्यादास म्हणे उजळवा दीप । दोषांचे संकल्प जाळोनिया ॥