जागविती भक्त आपुलिया ज्ञाने।
जागविती भक्त आपुलिया ज्ञाने। उघडा कर्णस्थाने बुद्धिचिये ॥
झाला अरुणोदय झोप सोडा मागा। आपुलिया लागा कर्तव्यासी ॥
काम,निष्पाप,निर्लेप व्हा मनी । आनंद-भुवनी क्रीडो आता ॥
तुकड्यादास म्हणे मिळोनिया सर्व । करू पंढरिराव आपुलासा ॥