कैसा मी जाईन तुज सोडोनिया ?।
कैसा मी जाईन तुज सोडोनिया ?। जळो माझी माया देवा ! आता ॥
ऐसे होते तरी कासया आणले ? । चित्त वेडे केले दारी तुझ्या ॥
माघारा दाखवू नको पायवाट । गेलो तरी नीट नेत्री राही ॥
तुकड्यादास म्हणे गळ्याची शपथ। मायेच्या पाशात लोटू नको ॥