जळो सर्व सुख राज्य-भोग अंगी ।
जळो सर्व सुख राज्य-भोग अंगी । चित्त पांडुरंगी लीन नोहे ॥
काय आम्हा त्याची चाड आहे मनी । असोनि नसोनि दुःखरूप ॥
राहो समाधान पांडुरंगी मन । तेचि त्रिभुवन-राज्य आम्हा ॥
तुकड्यादास म्हणे काहीही न राहो । परि तो न जावो पांडुरंग ॥