तुम्हाकडे पाही कोण ?



तुम्हाकडे पाही कोण? । हेचि घ्यारे ओळखोन ॥
पहाणे ते कैसे झाले? । कोणा कडोन पाहले ।।
पाहण्याची वस्तु सांडा । पहाणेचि हे पछाडा ॥
तुकड्या म्हणे सर्व-साक्षी । तोचि देव अंतरिक्षी ॥