वस्तू नोहे प्रिय प्रियु आहे

वस्तु नोहे प्रिय  प्रियु आहे अर्थ । जाणावे गुह्यार्थ विवेकाने ।।
जनी नाही प्रेम  प्रेम आहे कामी । वस्तु हे निकामी पडळ राहे ॥
प्रेम नित्य सत्य ओळखिल्यावरी । कळेल निर्धारी आत्मानंद ॥
तुकड्यादास म्हणे चेतन्य - स्वरूप । सर्व कार्यी दीप रंगे रंगी ॥