आनंद स्वरुप आत्मा परिपूर्ण
आनंद-स्वरूप आत्मा परिपूर्ण । नाही भेद-भान कोणे काळी ॥
उत्पत्ति व स्थिती आणि अंत होती । हे तो आहे मति अज्ञानाची ॥
कूटस्थ चिन्मय सदा एकरस । ब्रह्म अविनाश सर्व काळ ।॥
तुकड्यादास म्हणे तेचि माझे रूप । पहावे संकल्प दुरावोनी ॥
॥