सूर्य अधिष्ठानी न भासे अंधार


 सूर्य-अधिष्ठानी  न भासे अंधार । प्रकाश सर्वत्र दाही दिशा ॥
तैसे ज्ञानियाते भासेना अज्ञान ।वस्तु-परिच्छिन्न लया जाय ॥
तदाकार वृत्ति राहे आत्मरूपी । संकल्प विकल्प सारोनिया ॥
तुकड्यादास म्हणे नाम रूप सर्व । या नाही अस्तित्व अधिष्ठानी ॥