सूर्याचे प्रकाशी अंधार दिसेना

सूर्याचे प्रकाशी अंधार दिसेना । तैसा अधिष्ठाना भ्रम नोहे ॥
एकरस नित्य अक्षय अखंड । द्वैताद्वैत-बंड मायोपाधी ॥
वर्म ज्ञानियासी कळेल साचार । पाहता विचार वेदांताचा ॥
तुकड्यादास म्हणे राईचा पर्वत । अज्ञाने भासत जगामाजी ॥