राईचिया आड पर्वत साठवे
राईचिया आड पर्वत साठवे । यासीच म्हणावे गड्या! तैसे ॥
दृष्टिचिया भ्रमे प्रभू विसरावे । विषया पावावे अहोरात्र ॥
ऐसे नका करू देवे दिले ज्ञान । प्रत्यक्ष पाहोन निववा डोळे ॥
तुकड्यादास म्हणे देव हा जवळी । पाहे तीर्थावळी भ्रमे सारी