सुख दुःख जन्म मरणे सर्वही

सुख-दुःख जन्म-मरणे सर्वही । लाभ-हानि तेही मनामागे ॥
संकल्प-विकल्प मनाचा हा धर्म । तेणे वाढे वर्म पापपुण्या ॥
स्थीर करा मन साधा देव-पाय । भोग त्याग जाय दुरादुरी ।।
तुकड्यादास म्हणे जाणा हे निश्चये । भजा पंढरिराय मनोभावे ॥