संसाराचे मूळ मनापाशी राहे

 संसाराचे मूळ मनापाशी राहे । मन ओढताहे इंद्रियांना ।॥
संकल्प विकल्प मनाचा स्वभाव । जेणे उठे भाव विकारांचे ॥
मने पापपुण्य घडे या जीवासी । येर आत्मयासी दुःख कैचे? ॥
तुकड्यादास म्हणे धरा गुरु-पाय । मनासी उपाय विचाराया ।।