कोण म्हणे रुपी झाला दुजाभाव


कोण म्हणे रूपी झाला दुजाभाव। स्त्रीपुरूषावयव चैतन्यी या? ।
ऐसे नाही कोणी कथियले ग्रंथी । हे तो आहे स्थिती अविद्येची ॥
मुळ-प्रभू माझा नटला गौरवे । खेळ हे केशवे केले एकी ॥
तुकड्यादास म्हणे स्वरूप प्रांजळ । सदा सर्वकाळ एकरस