तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कोण म्हणे ब्रम्ही भेद
कोण म्हणे ब्रह्मी भेद । माया-पुरुषाचा वाद? ।।
एक चैतन्याचा खेळ । पाहता कळेल प्रांजळ ॥
भिन्न भिन्न दिसे तया । ही तो एकाचीच काया ॥
तुकड्या म्हणे हे चैतन्य। माया पुरुषी नाही भिन्न ॥