चैतन्याची माळ गुंफिली सकळ

 चैतन्याची माळ गुंफिली सकळ। मध्ये जीव-गोळ करोनिया ॥
जरी ते अंतर पडले तयांशी । तरी चैतन्याशी विसर नाही ॥
मणि एकिकडे जरी गेला दूरी । सूत्र ते अंतरी ब्रह्मरूप ।।
तुकड्यादास म्हणे एकाचे पासोन । झालेसे उत्पन्न सकळ जग ॥