सगुण निर्गुण ऐसे ज्याचे रुप

सगुण निर्गुण ऐसे ज्याचे रूप । सद्गुरु चिदरुप पांडुरंग ॥
अनंत अपार भरला घनदाट। चैतन्य अफाट नारायण ॥
सदा एकरस अखंड अव्यय । परिपूर्ण निर्भय परब्रह्म ।।
तुकड्यादास म्हणे नाही तया भेद । सर्वदा अभेद आत्माराम ॥