खचितचि येसी काय देवा !जनी ?

खचितचि येसी काय देवा!जनी?।आज का या स्थानी नाही बा तू? ॥
देव अवतार धरील सांगती । काय यांची रीति ठीक आहे? ॥
येणे जाणे तुज कासया कारणे? । उपाधि-बंधने नाही देवा! ॥
तुकड्यादास म्हणे सत्तामात्रे सर्व । करी देवराव सृष्टिकार्य ॥