झणि कृष्णसखा भेटो या काननी ।
झणि कृष्णसखा भेटो या काननी । ऐसे माझ्या मनी झाले बाई ॥
रंगली मी मनी झाली सावधान । लावियले ध्यान कृष्णमूर्ती ॥
डोलली भुलली आपुलिया देहा । विसरली भावाभाव सारे ॥
सुंदर स्वरूप प्रगट जाहले । गरुडिया आले कृष्णनाथ ॥
तुकड्यादास म्हणे विस्मित मी मनी । स्वरुप पाहुनी वेडी झाली ॥