शामरंग माझ्या दिसे श्रीकृष्णाचा ।
शामरंग माझ्या दिसे श्रीकृष्णाचा । पाहता मनाचा भाव झाला ॥
दाटले कि काय रूप डोळियाते । ऐसेची गमते अंतरंगी ॥
दिव्य तेज त्याच्या दिसे मुकुटाचे । किरणे प्रकाशे भानू जैसा ॥
तुकड्यादास म्हणे झळके पितांबर । झाकले अंबर तारियांनी ॥