सावळा सुंदर सखा नारायण ।
सावळा सुंदर सखा नारायण । रुक्मिणीरमण प्रीयु माझा ॥
तयावीण क्षण न जाई विमुख । सदा अंतर्मुख पाहो त्यासी ॥
भुललिया मज होतसे यातना । चैन नसे मना काही केल्या ॥
तुकड्यादास म्हणे जिवाचे जिवन । तनुमन धन तोचि माझा ॥