सांवळा सुंदर अयोध्येचा राजा।
सांवळा सुंदर अयोध्येचा राजा। नमस्कार माझा तया कोटी ॥
सत्वगुण-मूर्ति अवतार रामाचा । कैवारी भक्तांचा जिवे भावे ॥
भक्ताचियेसाठी धरिला अवतार । काननी साचार प्रवेशला ॥
तुकड्यादास म्हणे मदनाचा पुतळा। संहारी कळिकाळा ऋषीस्तव ॥