तारिली अहिल्या गौतमाची राणी ।
तारिली अहिल्या गौतमाची राणी । असता पाषाणी वनामाजी ॥
हनुमंताप्रति करुनिया साथी । केली धूळमाती लंकेलागी ।।
मारिला रावण राज्य जिंकियले । बिभिषणा दिले उदारत्वे ॥
तुकड्यादास म्हणे तया रामचंद्रा । भारत हे कदा विसरू नेणे ॥