राजस सुकुमार राम लक्ष्मण ।
राजस सुकुमार राम लक्ष्मण । सीतेसहित वन सेविताती ॥
भक्तासाठी कष्टी होती नारायण । सोसती दारूण दुःखे रानीं ॥
दुजियांच्या सुखी मानताति सुख । थोरांचे कौतुक ऐसे राहे ॥
तुकड्यादास म्हणे सेवुनी कानन । पित्याचे वचन पूर्ण केले ॥