रणाचा कर्कश असुरांचा अरी ।
रणाचा कर्कश असुरांचा अरी । भक्तांचा कैवारी राम माझा ॥
पुत्रदशरथाचा, काळ रावणाचा । प्राण मारुतिचा राम माझा ॥
तारिले पाषाण रजोधुळी देता । अहिल्ये तारिता राम माझा ॥
तुकड्यादास म्हणे वैकुंठीचा राव । तो लीला-लाघव राम माझा ॥