अंतरी बाहेरी घरी परदारी

अंतरी बाहेरी घरी परदारी। वाजवितो तारी ऐसा कोण ? ॥
मंजुळ वादने मी मोही अखंड । वाटती हे गोड शब्द कर्णी ॥
 सोहं हंसा ऐसा निघे प्रतिध्वनी । झुंजारे गगनी श्वासोच्छवासी ॥
तुकड्यादास म्हणे हा वेणू देवाचा । जाणे तो भाग्याचा योगीराज ॥