चक्रावरी चक्रे येती सुदर्शने
चक्रावरी चक्रे येती सुदर्शने । हृदय-भुवनी दिसे माझ्या ॥
रक्त शुभ्र शाम नीलप्रभा फाके । अंधार निशंके दुरी जाय ॥
शांत होय वृत्ति आपुल्या मानसी । गुंगी चढे जैसी शुन्याकार ।।
तुकड्यादास म्हणे सांगा अनुभवी!। काय ही असावी चिन्हे याची? ॥