वायु-अंजनीचा सुत ।

वायु-अंजनीचा सुत । सखा माझा हनुमंत ॥
जन्मताचि सूर्या छावी । करी उड्डाणे आघवी  ॥
रामभक्ती अति सिद्ध । रामायणी जो प्रसिद्ध ॥
तुकड्यादास म्हणे । भाग्ये पावती शहाणे ॥