संती गौरविला पुराणी गर्जिला ।
संती गौरविला पुराणी गर्जिला । मुकुट-मणी झाला हनुमंत ॥
काय त्याने सेवा केली एकनिष्ठ । ध्यानी आहे स्पष्ट सर्वाचिये ॥
वीर हनुमंते जाळियेली लंका । हृदयी पादुका धरोनिया ॥
तुकड्यादास म्हणे तोचि रामभक्त । हृदया दावीत फाडोनिया ॥