सर्व गर्जली पुराणे ।

सर्व गर्जली पुराणे । सेतू केला हनुमंताने ॥
धन्य भक्तीचा पुतळा । वश नोहे कळीकाळा ॥
फोडी दुष्टांचे अंतर । लंका जाळियेली पार ॥
तुकड्यादास म्हणे । दावी भक्तिची लक्षणे ॥