अंगी भस्माचे लेपन।

अंगी भस्माचे लेपन। गळा मुंडमाळा जाण ॥
सर्प अंगासी खेळती। नाचे पार्वतीचा पती ॥
राही  कैलास शिखरी । मूर्तिमंत वास करी ॥
तुकड्या म्हणे व्याघ्रांबर । भूषण मिरवीतो शंकर ॥