सखा भवानीचा पती।

सखा भवानीचा पती। नाचे तांडवाच्या रीती ॥
भस्मासुरा देई वर। भोळा गिरीश शंकर  ॥
जहरासी प्राशितां । जरा ना धरी खिन्नता ॥
तुकड्या म्हणे जटाजूट । शोभे माझा नीळकंठ ॥