डब डब डमरू-नादे ।

डब डब डमरू-नादे । नाचे शंकर आनंदे ॥
भोळा भोळा उमापती । हासे भिल्लीणी सांगाती ॥
भं भं शंख-स्वर । डोले भवानीचा वर  ॥
तुकड्यादास म्हणे । मुक्ति देतसे दर्शने  ॥